सुभाषचंद्र बोस (1897-1945) व आझाद हिंद सेना | Subhash chandra bose Marathi Mahiti

सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना: जीवनचरित्र, कार्य व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक येथे 23 जानेवारी 1897 रोजी झाला. जानकीनाथ बोस हे त्यांच्या वडिलांचे नाव. जानकीनाथ बोस हे ओरिसामधील एक धनाढ्य व प्रसिद्ध वकील होते. सुभाषबाबू बी.ए.ची परीक्षा स्कॉटिश चर्चमधून उत्तीर्ण झाले. तेथे त्यांनी सैनिकी शिक्षण घेतले. सुभाषचंद्र बोस 1920 साली ICS परीक्षा उत्तीर्ण झाले पण इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठतेची शपथ घेण्यास सांगितल्याने त्यांनी राजीनामा दिला आणि असहकार चळवळीत प्रवेश केला.

सुभाषचंद्र बोस कलकत्ता येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. 1924 साली चित्तरंजन दास कलकत्त्याचे महापौर बनले, तर मुख्याधिकारी (CEO) म्हणून सुभाषचंद्र बोस यांनी काम पाहिले. राजकीय कार्यात भाग घेतल्याबद्दल 1924 साली त्यांना तीन वर्षांची शिक्षा झाली व मंडालेच्या तुरुंगात स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. 1927-28 पासून सुभाषचंद्र बोस व जवाहरलाल नेहरू है काँग्रेसमधील तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले. 1928 च्या कलकत्ता अधिवेशनात नेहरू अहवालातील अंतर्गत स्वायत्ततेच्या ठरावाचा त्यांनी जोरदार विरोध केला, ते पूर्ण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.

1938 च्या हरिपुरा काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले, पण 1939 साली त्यांना काँग्रेसचा त्याग करावा लागला. 1939 च्या त्रिपुरी अधिवेशनात गांधींचे समर्थक पी. सीतारामय्या यांना हरवून सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाले. अध्यक्षपदावरून बोस व काँग्रेस नेतृत्वात मतभेद निर्माण झाले होते. या काळात सर्वसामान्यांची चळवळ तत्काळ उभी करावी, असे बोस यांना वाटत होते, तर त्यासाठी अजून योग्य वेळ आली नाही, असे काँग्रेसच्या नेतृत्वाचे म्हणणे होते.

त्रिपुरी येथे गांधींनी काँग्रेस कार्यकारिणी निवडावी, असा ठराव त्यांच्या समर्थकांनी मांडला होता, तर गांधींचे म्हणणे होते बोस यांनी ती स्वतः निवडावी. बोस यांनी याला नकार दिला. एकट्याला संघटनेचे नेतृत्व करता येणार नाही हे त्यांना माहीत होते. पण ते बहुमताचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यांचे म्हणणे होते चळवळीचे पुढील नेतृत्व गांधीनीच करावे. फक्त व्यूहरचना व नीती डाव्या गटांची स्वीकारावी. गांधी या गोष्टला तयार नव्हते.

बहुमताचा प्रश्न व झालेल्या वैचारिक कोंडीमुळे सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा (एप्रिल 1939) दिला. यावेळी अध्यक्षपदी राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली व बोस यांनी मे 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली. जुलै 1939 मध्ये काँग्रेसच्या ठरावाच्या विरोधात त्यांनी निषेधाचे आवाहन केले. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली व त्यांना बंगाल प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदावरून काढले. तसेच काँग्रेसमधील कोणतेही पद धारण करण्यास तीन वर्षे मनाई केली. 8 ऑक्टोबर 1939 रोजी नागपुरात सुभाषचंद्र बोस यांनी साम्राज्यवादविरोधी परिषद आयोजित केली. बी. टी. रणदिवे हे वा परिषदेचे उद्घाटक होते.

सप्टेंबर 1939 मध्ये ज्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा काँग्रेसने इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरू करावे, असे त्यांचे मत होते. त्यांनी जनतेलाही आवाहन केले की ब्रिटिश शासनाला युद्धप्रयत्नात कुठल्याही प्रकारची मदत करू नये, या सरकारविरोधी मतांमुळे त्यांना जुलै 1940 मध्ये तुरुंगात ठेवले. या अन्यायकारक अटकेविरोधी त्यांनी उपोषण सुरू केले. डिसेंबर 1940 मध्ये त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले. यावेळी ते अशा मतास येऊन पोहोचले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी व्यापक सशस्त्र उठावाची गरज आहे. त्यासाठी भारताबाहेर जाऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.

17 जानेवारी 1941 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी झियाउद्दीन नाव धारण करून पठाणाच्या वेशात पोलिसांची नजर चुकवून आपल्या कलकत्त्यातील घरातून निसटले. 19 जानेवारीस त्यांनी पेशाबर गाठले. 26 जानेवारीला काबूलची (अफगाणिस्तान) वाट धरली. काबूलनंतर ते रशियाची राजधानी मॉस्को येथे गेले व तेथून बर्लिन (जर्मनी) येथे (3) एप्रिल 1941) गेले. यावेळी त्यांना रशियन राजदुतापेक्षा इटालियन राजदुताची मदत झाली. काबूल, मॉस्कोमार्गे बर्लिनला जाताना त्यांनी ऑरलंडो मझोटा हे नाव धारण केले होते. बर्लिन रेडिओवरून त्यांनी भारतीयांना इंग्रजांविरुद्ध हल्ल्याचे आवाहन केले.

1941 साली जर्मनीतील भारतीयांच्या मदतीने त्यांनी ‘फ्री इंडिया सेंटर’ स्थापन केले. त्याच्या अनेक शाखा काढल्या. रोम व पॅरिसमध्येही फ्री इंडिया सेंटरच्या शाखा होत्या. चरख्याऐवजी झेप घेणाऱ्या वाघाचे चित्र असलेला तिरंगी झेंडा त्यांनी युरोपात फडकाविला. रवींद्रनाथ टागोर यांचे जण-गण-मन हे राष्ट्रगीत म्हणून मान्य करून ते सुभाषचंद्र व त्यांचे सहकारी गाऊ लागले.

भारतीय सैन्य उभारण्यास जर्मनी अनुकूल होता. पण भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करण्यास हिटलर उत्सुक नव्हता. जर्मनीतील फ्री इंडिया सेंटरचा कारभार ए.सी.एन. नांबियार या सहकाऱ्याकडे सोपवून अबीद हसन सफ्रानी या मित्रासोबत 8 फेब्रुवारी 1943 रोजी नेताजी पूर्वेकडे निघाले. सुरुवातीला जर्मनीच्या यू बोटीतून व नंतर 28 एप्रिलला एका जपानी पाणबुडीतून प्रवासास सुरुवात करून 13 जून 1943 रोजी नेताजी जपानला पोहोचले. तेथे काही भारतीय एकत्र आले होते, इंग्रज हरल्यावर त्यांना सिंगापूर व मलेशियात सोडून गेले होते आणि जे युद्धकैदी म्हणून जपानच्या हाती सापडले होते, त्यांना घेऊन रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. मलेशियात स्थायिक झालेल्या भारतीयांनी सुभाषबाबूंना पूर्व नैतिक व आर्थिक समर्थन दिले. जपाननेसुद्धा लष्करी मतीचे आश्वासन दिले होते.

मार्च 1942 रोजी टोकियो येथे परिषद भरली, यात भारताच्या स्वातंत्र्याला मदत करण्यासाठी पूर्वेकडील देशांत राहणाऱ्या भारतीयांनी सहभाग घेतला. यातील निर्णयानुसार ‘आझाद हिंद सेना’ हे सैन्यदल व ‘इंडियन इंडिपेंडेंस लीग’ हे नागरी संघटन स्थापण्याचा निर्णय झाला. अमरसिंग व प्रीतमसिंग हे इंडियन इंडिपेंडेंस लीगशी संबंधित होते.
बँकॉक येथे दुसरी परिषद भरली. यावेळी अध्यक्ष रासबिहारी बीस होते. या ठिकाणी इंडियन इंडिपेंडेंस लीगबी स्थापना झाली. भारताची स्वातंत्र्यप्राप्ती हे लीगचे उद्दिष्ट होते. या परिषदेने सुभाषचंद्र बोस यांना इंडिपेंडेंस लीगचे नेतृत्व करण्यासाठी पूर्व आशियात येण्याचे आमंत्रण दिले.

1 सप्टेंबर 1942 रोजी रासबिहारी बोस व कैप्टन मोहनसिंग यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. इंडियन इंडिपेंडेंस लीगने आझाद हिंद सेनेला माणसे, पैसा व इतर साहित्य पुरविण्याची जबाबदारी स्वीकारली. या सेनेच्या कार्यपद्धतीवरून रासबिहारी व कॅप्टन मोहनसिंग यांच्यात मतभेद निर्माण झाले. तसेच जपानी सेनाधिकारी आझाद हिंद सेनेचे स्वतंत्र अस्तित्व न मानता आपल्याच सैन्याचा एक भाग म्हणून वागणूक देत असत. ही परिस्थिती सुभाषबाबू बदलू शकतील म्हणून त्यांना रासबिहारी व मोहनसिंग यांच्या वतीने जपानमध्ये येण्याचे निमंत्रण पाठविण्यात आले.

2 ऑक्टोबर 1943 रोजी गांधींची पंचाहत्तरी होती. ते ‘आगाखान पॅलेस’मध्ये बंद होते. सुभाषचाबू यावेळी सिंगापूरला होते. सेनेसह हा दिवस त्यांनी मोठ्या धडाक्याने साजरा केला. गांधींना त्यांनी प्रथमच ‘राष्ट्रपिता’ म्हणून संबोधले. जून 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस जपानमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी पंतप्रधान तेजो यांची भेट घेतली. जुलै 1943 मध्ये ते सिंगापूरला गेले आणि 4 जुलै 1943 रोजी आझाद हिंद सेना व इंडियन इंडिपेंडेंस लीग याचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी स्वतंत्र भारताच्या अस्थायी सरकारची स्थापना केली. यानंतर त्यांना ‘नेताजी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या सेनेतील पथकांची नावे ‘गांधी, नेहरू, झाशीची राणी पथक’ असे होते.

राणी झाशी रेजिमेंटला ‘मायमोला’ युद्ध आघाडीवर जाण्याची संधी मिळाली होती.

शहानवाझ खान हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते. मेजर प्रकाश आझाद ब्रिगेडचे प्रमुख होते तर नेहरू ब्रिगेडचे प्रमुख मुहम्मद झमान किमयानी हे होते.

21 ऑक्टोबर 1943 रोजी स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारच्या स्थापनेची घोषणा सिंगापूरच्या कॅथे सभागृहात करण्यात आली. वा सरकारला जपान, जर्मनी व इटली या देशांची लगेच मान्यता मिळाली. या हंगामी सरकारने इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्धाची घोषणा केली.

जपानी सैन्याच्या मदतीने अंदमान व निकोबार जिंकून त्याचे नामकरण शहीद व स्वराज्य असे करण्यात आले. भारतातील मोवडॉक व कोहिमा जिंकले. शेवटी फार्मोसा (तैवान) मधील तैपेह येथून मांचुरियातील डेरेनकडे जाताना 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात नेताजींचे निधन झाले.

आझाद हिंद सैनिकांवरील खटले: 21-23 सप्टेंबर 1945 रोजी मुंबई येथे भरलेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस समितीने सैनिकांना पाठिंबा देणारा एक जोरदार ठराव मंजूर केला. सैनिकांच्या बचावासाठी भुलाभाई देसाई, तेजबहादूर सजू, कैलासनाथ काटजू, असफ अली व स्वतः जवाहरलाल नेहरू हे लाल किल्ल्यातील ऐतिहासिक खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात उभे राहिले. काँग्रेसने ‘आझाद हिंद सेना मदत व चौकशी’ समितीची स्थापना केली. संपूर्ण देशभर सैनिकांच्या बाजूने प्रतिक्रिया उमटत होत्या, ठिकठिकाणी होणाऱ्या सभांद्वारे त्यांना पाठिंबा वाढत होता. Patriots not Traitors (देशद्रोही नव्हे देशभक्त) सारख्या पुस्तिका वितरित होत होत्या. 12 नोव्हेंबर 1945 हा दिवस आझाद हिंद सेना दिन, तर 5 ते 11 नोव्हेंबर 1945 हा आठवडा ‘आझाद हिंद सेना सप्ताह’ म्हणून पाळण्यात आला. कलकत्ता येथे देशभरातील मोठी सभा भरली. शरद बोस, नेहरू व पटेल यांची भाषणे झाली.

1945-46 च्या येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे निवडणुकांची सभा व आझाद हिंद सैनिकांना समर्थन देण्याची सभा यात भेद करणे सरकारलाही शक्य होत नव्हते.
भारतातील विविध स्तरांतून सैनिकांना पाठिंबा व्यक्त होत होता. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास, उत्तर प्रदेश व पंजाब या राज्यांतील शहरे आंदोलनाची केंद्रे होती. काँग्रेसशिवाय विविध पक्षही यात सहभागी होते. मुस्लीम लीग, भारतीय समाजवादी पक्ष, युनिवनिस्ट पार्टी, अकाली, जस्टिस पार्टी, रावळपिंडीचे अहरार, शीख लीग, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वांनी कमी-अधिक प्रमाणात मदत केली.

सहभागाचे अनेक प्रकार होते – देणग्या देणे, सभा घेणे, त्यांना हजेरी लावणे, दुकाने बंद करणे, निधी उभारणे,

नोव्हेंबर 1945 साली लाल किल्ल्यात चाललेला पहिला खटला प्रेमकुमार सहगल (हिंदू), शाहनवाज खान (मुस्लीम) व गुरुवक्षसिंग धिल्लाँ (शीख) यांच्यावर होता.
या सर्व गदारोळात आझाद हिंद सेनेची कृती बरोबर की चूक हा प्रश्न मागे पडून भारतीयांविषयीच्या एखाद्या प्रश्नाचा निर्णय घेण्याचा ब्रिटनला हक्क आहे का, हा प्रश्न केंद्रस्थानी आला. वायव्य सरहद्द प्रांताच्या गव्हर्नरांनी खटले मागे घेण्याची सूचना केली. कारण आता हा प्रश्न ‘ब्रिटन विरुद्ध भारत’ असे रूप धारण करत आहे, असे त्यांना वाटले.

फेब्रुवारी 1942 मध्ये चंग के शेक हे चिनी नेते भारत भेटीवर आले असताना त्यांनी जाहीरपणे भारताच्या स्वातंत्र्यकांक्षेला सहानुभूती व्यक्त केली होती.

सुभाषचंद्र बोस संपूर्ण माहिती

  • जन्म – 23 जानेवारी 1897
  • पदवी – 1919 (कलकत्ता विद्यापीठ)
  • ICS – उत्तीर्ण 1920
  • कलकत्ता नगरपालिकेचे CEO – 1924
  • हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष – 1938
  • काँग्रेसचा राजीनामा – 1939
  • फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना – में 1939
  • तुरुंगात टाकले – जुलै 1940
  • नजरकैदेतून सुटका – 17 जानेवारी 1941
  • जर्मनीत प्रवेश – एप्रिल 1941
  • फ्री इंडिया सेंटर (जर्मनीत) – 1941
  • जपानला गेले – 1943
  • सिंगापूरला जुलै – 1943
  • आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले – 4 जुलै 1943
  • स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची घोषणा – 21 ऑक्टोबर 1943 (सिंगापुर)
  • अंदमान-निकोबार जपानने जिंकून आझाद हिंदकडे दिले – डिसेंबर 1943
  • मोवडाँक जिंकले – एप्रिल 1945
  • विमान अपघातात नेताजींचे निधन – 18 ऑगस्ट 1945

मला अशा आहे या लेखातून तुम्हाला सुभाष चंद्र बोस आणि त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेने बद्दल संपूर्ण माहिती समजली असतील. तुमच्या शंका आणि तुम्हाला अजून एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment