काँग्रेस समाजवादी पक्ष : स्थापना, विचारसरणी आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
चौरीचौरा घटनेमुळे असहकार आंदोलन मागे घेतल्याने काँग्रेसमधील तरुण व प्रखर विचारांचा गट नाराज झाला. यातून ‘स्वराज्य पक्षाची’ स्थापना झाली. कालांतराने त्याचेही कार्य मंदावले. नेहरू-बोस आदी मंडळी रशियातील समाजवादी क्रांतीने प्रभावित झाली होती. आर्थिक समता, सामाजिक न्याय या बाबींना राजकीय स्वातंत्र्याइतकेच महत्त्व आहे, अशी त्यांची धारणा बनली.
1930-31 सालची सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतल्यावर काँग्रेसंतर्गत डाव्या गटाला गांधींचे हे अहिंसेचे धोरण पटेनासे झाले. मार्क्सवाद व रशियाकडे जरी ते आकर्षित झाले होते तरी भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे धोरण त्यांना मान्य नव्हते.
मे 1934 मध्ये तत्कालीन बिहारच्या रांची येथे डॉ. अन्सारी, बिधनचंद्र रॉय, भुलाभाई देसाई आदींनी स्वराज्य पक्षाच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव मांडला. तेव्हा मिनू मसानी यांनी काँग्रेसने शेतकऱ्यांना व कामगारांना संघटित करण्यावर भर द्यावा अशी दुरुस्ती सुचवली.
समाजवादी पक्षाने काँग्रेसचे नाव लावू नये अशी काही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती. पण तसे न करता 17 मे रोजी पाटणा येथे आचार्य नरेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली परिषद भरवून काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस समाजवादी पक्षाचा कार्यक्रम भारतातील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आखण्यात आल्याचे मत गांधीजींनी मिनू मसानी यांना कळविले होते.
काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना (ऑक्टोबर 1934)
या पक्षाची पहिली परिषद मुंबई येथे 21 व 22 ऑक्टोबर 1934 रोजी झाली. तिचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण होते. या परिषदेत पार्टीच्या औपचारिक स्थापनेची घोषणा करण्यात आली.
या परिषदेत जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, मिनू मसानी, संपूर्णानंद, ना. ग. गोरे, अच्युत पटवर्धन, राम मनोहर लोहिया या नेत्यांचा समावेश होता.
या पक्षाचे चार मूलभूत सिद्धांत होते.
- समाजवादाच्या मार्गावर राष्ट्रवाद हा आवश्यक टप्पा आहे.
- काँग्रेस अंतर्गतच काम करावे.
- काँग्रेस व राष्ट्रीय चळवळीला समाजवादी चळण लावावे.
- त्यासाठी कामगार व शेतकरी यांच्या संघटना स्थापाव्यात.
काँग्रेसमध्ये बदल घडविण्यासाठी समाजवादी पक्षाने दोन परिवर्तनांवर भर दिला.
1. वैचारिक परिवर्तन – यानुसार काँग्रेसचे आर्थिक बार्बीविषयीचे विचार कामगार व शेतकऱ्यांकडे वळविणे व त्यानुसार शेतकऱ्यांसाठी अनुकूल कार्यक्रम हाती घेणे,
2. संघटनात्मक परिवर्तन – काँग्रेसच्या नेतृत्वात बदल घडविण्याचा प्रयत्न करणे. काँग्रेसच्या वरिष्ठ उजव्या नेतृत्वाच्या जागी समाजवादी नेतृत्व प्रस्थापित करणे.
1936 साली काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर नेहरूंनी आपल्या कार्यकारिणीत तीन समाजवाद्यांना घेतले जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन व नरेंद्र देव.
1939-1940 च्या त्रिपुरी येथील रामगढ़ अधिवेशनात काँग्रेसवर डाव्या गटाच्या वर्चस्वाची शक्यता होती. पण पक्षाचे विभाजन करून नेतृत्व देण्यास कमी पडण्याच्या धास्तीने समाजवाद्यांनी माघार घेतली.
1939 च्या गांधी-बोस संघर्षात समाजवाद्यांनी सुभाषचंद्र बोस यांची बाजू घेतली नाही त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली.
काँग्रेस समाजवाद्यांचा राष्ट्रीय चळवळीतील सहभाग
समाजवाद्यांनी 1935 च्या कायद्याचा निषेध केला. ‘साम्राज्यवादी आणि राष्ट्रीय प्रतिक्रियावादी शक्तींचे जनविरोधी संघटन, अशी त्याची संभावना केली.
त्यांनी प्रांतिक निवडणुकीत भाग घेण्याचे ठरविले. यात त्यांचे धोरण असे होते, की सरकार स्थापन करण्यास नकार देऊन राजकीय पेच निर्माण करावा. अशा अर्थाचा ठराव त्यांनी 1936 च्या लखनौच्या अधिवेशनात मांडला होता. पण तो पारित झाला नाही.
➤ 1937 साली काँग्रेसची मंत्रिमंडळे बनविण्यास विरोध केला. पण काँग्रेसने मंत्रिमंडळे बनविली. यावेळी विजयालक्ष्मी पंडित, रफी अहमद किडवाई, संपूर्णानंद या समाजबादी नेत्यांनी मात्र पदे ग्रहण केल्यामुळे काँग्रेस समाजवादी पक्षामध्ये नाराजी निर्माण झाली.
राजकीय कैद्यांना मुक्त करण्याचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे उचलून धरला. पक्षाने 14 ऑगस्ट 1937 रोजी अखिल भारतीय अंदमान दिन साजरा करून कैद्यांची सुटका व अंदमान जेल बंद करण्याची मागणी केली.
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या सहकार्याला पक्षाने विरोध केला.
कॉंग्रेसच्या भारत छोडो चळवळीचे समर्थन केले. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्यानंतर समाजवादी नेत्यांनी भूमिगत चळवळीच्या माध्यमातून या चळवळीचे नेतृत्व केले. काँग्रेस समाजवादी पुरुषोत्तमदास त्रिकमदास हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते. काँग्रेस समाजवादी पक्षाने क्रिप्स मिशन, माऊंटबॅटन प्लॅन अशा सर्व योजना फेटाळल्या. ब्रिटिशांशी समझौता करणे म्हणजे राष्टाशी धोका करणे, असे त्यांचे मत होते. त्यांनी फाळणीला विरोध केला.
गांधीजींच्या मृत्यूनंतर समाजवादी पक्षाचे नेते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्या आधीच 1947 च्या कानपूर अधिवेशनातच त्यांनी आपल्या नावातून काँग्रेस शब्द वगळला. तसेच काँग्रेसच्या फेब्रुवारी 1948 मधील निर्णयानुसार काँग्रेसअंतर्गत दुसऱ्या कोणत्याही पक्षला काम करता येणार नव्हते. अखेर नाशिक येथील अधिवेशनात मार्च 1948 मध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 1952 साली कृषक मजदूर पक्ष व समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्ष स्थापन करण्यात आला.
काँग्रेस समाजवादी पक्ष व कम्युनिस्ट (साम्यवादी)
1935-40 या काळात काँग्रेस समाजबादी पक्षाने व कम्युनिस्टांनी एकत्र कार्य करण्याचा प्रयत्न केला. कम्युनिस्ट पक्षावर बंदी होती, त्यामुळे त्यांना राजकीय कार्य करता यावे यासाठी समाजवादी पक्षाने आपले दरवाजे उघडे केले. पण दोघांमधील मतभेदांमुळे ते एकमेकांजवळ वेण्याऐवजी दूरच गेले. साम्यवादी पक्ष समाजवाद्यांना ढोंगी समाजवादी व अमेरिकेचे दलाल म्हणत, तर समाजवादी असणाऱ्या साम्यवाद्यांना रशियाचा उपग्रह म्हणत. समाजवादी पक्ष वैचारिक व संघटनात्मक पातळीवर भारतीय तत्त्व अनुसरत होता.
Conclusion
मला अशा आहे Congress Socialist Party Information in Marathi या लेखातील संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. काही शंका असतील gkinmarathi@gmail.com या आमच्या अधिकारीक gmail आयडी वर संपर्क साधा.
Also Read