साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्यलढा
1. एम. एन. रॉय (1887-1954)
कलकत्ताजवळील अरबालिया नावाच्या खेड्यामध्ये भट्टाचार्य या ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव नरेन (नरेंद्र) व आडनाव भट्टाचार्य, मानवेंद्रनाथ रॉय हे त्यांनी नंतर (1916) धारण केलेले नाव.
शालेय शिक्षण पूर्ण करून कलकत्त्याच्या नॅशनल महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षाला असतानाच नरेन सशस्त्र क्रांतिकारकांच्या चळवळीत ओढले गेले. त्यांच्याविरुद्ध तीन-चार खटले झाले. ‘हौरा कॉन्स्पिरसी केस’ हा त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला प्रसिद्ध खटला. त्यामध्ये आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली (1911).

नरेंद्रनाथ भट्टाचार्य उर्फ मानवेंद्रनाथ रॉय हे क्रांतिकार्यासाठी विविध देशांत भ्रमंती करत असताना ‘फादर मार्टिन’ या नावाने 1915 साली सॅन फ्रान्सिस्को येथे दाखल झाले. 1915 साली रॉय यांनी चार्ल्स मार्टिन या नावाने भारत सोडला व 1930 साली डॉ. मुहम्मद या मुस्लीम वेशांतरात मुंबईत दाखल होऊन आपल्याच मॅनिफेस्टोचा प्रचार करू लागले.
न्यूयॉर्क येथे असताना त्यांचा लाला लजपतराय यांच्याशी संबंध आला. त्यानंतर ते व त्यांची पत्नी ‘एव्हेलीन’ मेक्सिकोत गेले. रॉयच्या 13, मोहिनी रोड, शिमला येथील निवासस्थानात अनेक मूर्ती, कलाकृती होत्या.
मेक्सिकोमधील रॉय यांचे जीवन महत्त्वाच्या घटनांनी भरलेले होते. तेथे ते जुलै 1917 पासून नोव्हेंबर 1919 पर्यंत वास्तव्यास होते. या कालावधीत त्यांनी त्या देशाच्या राजकारणात भाग घेतला. बोरोडीनच्या सल्ल्यावरून रॉय यांनी मेक्सिकोत कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली.
1918 साली त्यांनी मेक्सिकन समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1919 साली त्यांनी त्या पक्षाचे साम्यवादी पक्षात रूपांतर केले. रशियाबाहेर स्थापना झालेला असा तो पहिलाच साम्यवादी पक्ष होता.
मेक्सिकोत रॉय यांची रशियन क्रांतीचा एक पुढारी पुझेनबर्ग उर्फ बोरोडीन याच्याशी गाठ पडली. दोघे उत्तम मित्र झाले. लेनिनला रॉयची माहिती झाली ती बोरोडीनमार्फतच. बोरोडीननेच नंतर रॉय यांना मॉस्को येथे भरणाऱ्या साम्यवादी चळवळीच्या जागतिक परिषदेला हजर राहण्याचे लेनिनचे आमंत्रण दिले. रॉय यांनी ते आमंत्रण स्वीकारले आणि परिषदेला हजर राहण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 1919 मध्ये मेक्सिको बोडले.
ऑगस्ट 1920 मध्ये भरलेल्या अधिवेशनाला रॉय मेक्सिकोच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी या नात्याने उपस्थित होते. भारतातून आलेल्या शिष्टमंडळात अवनी मुखजर्जी व श्म. पी. बी. टी. आचार्य यांचा समावेश होता.
काँग्रेसपुढे मंमत करून घ्यावयाच्या लेनिनप्रणीत मसुद्यातील अकरावे कलम रॉय यांना मान्य नव्हते, लेनिनच्या मते, कम्युनिस्टांनी पौर्वात्य मागास देशातील भांडवलशाही राष्ट्रवादी लोकशाही स्वातंत्र्य लढ्याला मदत करायला हवी होती. रॉय यांनी या कलमाला विरोध करून ते वगळण्याची सूचना केली, त्यानुसार दुरुस्ती करण्यात येऊन कम्युनिस्ट पक्षांनी क्रांतिकारक स्वातंत्र्यलढ्याला मदत करायची आणि विशेष म्हणजे ‘मदतीचा प्रकार तेथील स्थानिक पक्षाने वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून निश्चित करायचा होता.’
एम. एन. रॉय यांनी आपल्या पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘द व्हेन्गार्ड’ नावाचे पत्र जर्मनीतून चालविले. त्यांनी ‘इंडिपेंडंट इंडिया’ साप्ताहिक काढले,
रॅडिकल डेमॉक्रेटिक पार्टी (1940) मार्क्सवादाने निराश झाल्यानंतर एम. एन. रॉय यांनी रॅडिकल डेमॉक्रेटिक पार्टीची स्थापना केली. व्ही. एम. तारकुंडे हे या पक्षाचे जनरल सेक्रेटरी होते. वसंतराव कर्णिक, मणीबेन कारा आदि मंडळी त्यांच्या सोबत होती. या पक्षाने दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांना पाठिंबा जाहीर केला. 1948 साली हा पक्ष विसर्जित करण्यात आला.
‘इंडिया इन ट्रान्झिशन’ हे पुस्तक मानवेंद्रनाथ रॉय यांनी लिहिले, यात 1857 चा उठाव व भारतीय राजकारणाचे विश्लेषण करण्यात आले असून, सदर पुस्तक 1922 साली जिनिव्हा येथे प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात भारताच्या इतिहासाचा धावता आढावा घेतला असला तरी महात्मा गांधी व असहकारिता चळवळ हा तत्कालीन विषय त्यात होता.
न्यू ओरिएंटेशन (1946), विवाँड कम्युनिझम (1947), न्यू ह्यूमॅनिझम (1947), इंडियाज मेसेज (1950), रॅडिकल ह्यूमॅनिझम (1952), रीझन, रोमॅटिसिझम अँड रेव्होल्यूशन इ. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत. त्यांनी विपुल लेखन केले असून त्यांच्या ग्रंथांची संख्या सत्तरांवर भरते.
2. श्रीपाद अमृत डांगे (1899-1991)
श्रीपाद अमृत डांगे हे महाराष्ट्रातील आद्य कम्युनिस्ट. डांगे यांचा जन्म नाशिकला झाला. बालपण तेथेच गेले. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर सावरकरांचा प्रभाव पडला. पुढे त्यांचा प्रवास टिळक व मार्क्स असा झाला. त्यांचे नेतृत्व कामगार चळवळीतून बाढले. गांधींच्या असहकारितेच्या आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता.
विल्सन कॉलेजात ख्रिस्ती नसलेल्या विद्यार्थ्यांनाही बायबलचा तास सक्तीचा असे. त्याविरुद्ध चळवळ करून डांगे यांनी विल्सन कॉलेजच्या व्यवस्थापनास तो तास ऐच्छिक करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांना कॉलेजमधून काढून टाकले.

सुरुवातीला ते मवाळ पक्षाच्या विरोधात होते. टिळक व लजपतराय आदी जहालांच्या सभा डांगे व निंबकर आयोजित करत. असहकाराच्या चळवळीत राष्ट्रीय शाळेत त्यांनी शिक्षकाचे काम केले.
मुंबईत कामगारांमध्ये काम करीत असताना आर. बी. लोटवाला या गिरणीमालकाशी डांगेचा परिचय झाला. डांग्यांना आपल्याकडे नोकरीस घेण्याकारिता त्यांनी विठ्ठलभाई पटेलांमार्फत प्रयत्न केले. पटेल बंधूंशी डांगेंचे प्रथमपासून मित्रत्वाचे संबंध होते. 1921 मध्ये डांगे विठ्ठलभाई पटेलांचे चिटणीस म्हणून काम पाहत होते.
लोटबाला शेठच्या सहवासातून डांगे यांनी 1920-21 पासून साम्यवादाबा पुरस्कार करण्यास व कामगारांचे लढे उभारण्यास सुरुवात केली.
1921 मध्ये डांगे यांनी लिहिलेल्या गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तिकेमुळे डांगेंचा परिचय मानवेंद्रनाथ रॉय यांच्याशी झाला. त्यांनी Vanguard या आपल्या साप्ताहिकातून त्याचे परीक्षण देखील केले.
1923 मध्ये डांगे आणि केशवराव जोगळेकर यांनी हिंदुस्थान लेबर सोशालिस्ट पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला.
फेब्रुवारी 1924 साली कानपूर कट खटल्यातील आरोपी म्हणून डांगे तुरुंगात गेले व 1927 साली त्यांची सुटका झाली.
डांगे मीरत कटात तुरुंगात असताना गांधींनी त्यांची भेट घेऊन कायदेभंगाच्या चळवळीला पाठिंबा मागितला आणि डांगे यांनी चळवळ मध्येच थांबवायची नाही या अटीवर तो दिला. तरीसुद्धा चळवळ केव्हा थांबवयाची याचे शास्त्र आपण गांधींकडून शिकलो, असे डांगे प्रांजळपणे सांगतात.
4 सप्टेंबर 1937 रोजी डांगे यांनी क्रांती हे साप्ताहिक पुन्हा सुरू केले.
श्रीपाद डांगे यांची पुस्तके/वृत्तपत्रे
पुस्तके
- गांधी व्हर्सेस लेनिन (1921) या पुस्तिकेमुळे डांगेंचा परिचय मानवेंद्रनाथ रॉय यांच्याशी झाला.
- व्हेन कम्युनिस्टस् डिफर
- महात्मा गांधी अँड हिस्ट्री 1969 साली गांधींच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून ही पुस्तिका प्रकाशित केली.
मासिके व वृत्तपत्र
1. ‘सोशालिस्ट’ (1922)
साम्यवादी विचारांच्या प्रचारार्थ त्यांनी सोशालिस्ट हे पहिले साम्यवादी वृत्तपत्र 1922 साली सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी इंडियन सोशालिस्ट लेबर पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले.
मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशीन आल्याने 228 मुलींची नोकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार बिज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. नवे मशीन हे कामगार चळवळीपुढील मोठी समस्या आहे, असे सोशालिस्टमध्ये कब्रिड डांगे यांनी लिहिले.
2. लोकयुद्ध – दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी व युद्ध प्रयत्नात मदत करण्यासाठी त्यांनी ‘लोकयुद्ध’ नावाचे वर्तमानपत्र सुरू केले.
3. यंग कॉलेजियट – हे मासिक श्रीपाद अमृत डांगे ब त्र्य. बी. पर्वते यांनी काढले.
- 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गिरणी कामगारांना त्यांनी संपाचे आवाहन केले.
- 1939 साली त्यांनी महागाई भत्त्याच्या प्रश्नावर गिरणी कामगारांचा संप प्रदीर्घ काळ चालविला. त्याबद्दल त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.
- 1943 साली ते सुटले व आयटकचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1946 साली कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधानसभेवर निवडून गेले आणि 1957 च्या निवडणुकीत त्या पक्षातर्फे ते लोकसभेवर निवडले गेले.
3. एम. सिंगारवेलू चेट्टीयार
1925 साली भरलेल्या भारतातील पहिल्या कम्युनिस्ट कॉन्फरन्सचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनीच केरळातील किसान व कामगारांच्या चळवळी सुरू केल्या, व्यवसायाने वकील असलेल्या सिंगारवेलूंनी असहकारितेत सामील होऊन वकिली सोडली होती.
4. बी. टी. रणदिवे
रणदिवे हे कम्युनिस्ट पक्षात 1929 च्या आसपास आले. त्यांच्या कुटुंबाचा प्रार्थना समाजाशी संबंध होता.
5. रफिक अहमद
‘द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया इट्स फॉरमेशन अबोड’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. रफिक अहमद हे भारतामधून अफगाणिस्तानात हिजरत करून गेलेल्या हजारो मुस्लिमांमध्ये एक महत्त्वाचे नाव होते. या पुस्तकात कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेस मुस्लीम व खिलाफत चळवळ कशी फायद्याची ठरली, याचे विवेचन आले आहे.
इंग्लंडमध्ये भारतासाठी कार्य करणारे कॉम्रेड शापूरजी सकलातवाला मुंबईत आले असताना 24-25 एप्रिल 1928 रोजी भरलेल्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने त्यांच्या सत्काराचा ठराव केला. याच बैठकीत कमिटीने मीरत कटाच्या खटल्यात अडकलेल्या कम्युनिस्टांच्या बचावासाठी 1500 रुपयांच्या मदतीचा ठरावही संमत केला.
6. सौम्येंद्रनाथ टागोर
क्रांतिकारी साम्यवादी पक्ष (रिव्होलुशनरी कम्युनिस्ट पार्टी) (1942)
Conclusion
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात साम्यवादी नेत्यांचे योगदान हे केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी कामगार, शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठीही संघर्ष केला. एम. एन. रॉय, श्रीपाद अमृत डांगे, एम. सिंगारवेलू चेट्टियार, बी. टी. रणदिवे, रफिक अहमद आणि सौम्येंद्रनाथ टागोर यांसारख्या नेत्यांनी साम्यवादी विचारांचा प्रसार करत ब्रिटिश साम्राज्यवादाला विरोध केला. मला अशा आहे साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्यलढा या लेखातून तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल, तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Also Read