संपूर्ण संगणक ज्ञान मराठी मध्ये | Basic Computer Knowledge in Marathi

संपूर्ण संगणक ज्ञान मराठी मध्ये | Basic Computer Knowledge in Marathi

मित्रांनो, आजच्या आधुनिक युगात आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या दुनियेत ‘संगणक ज्ञान’ (Computer Knowledge) हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. स्पर्धा परीक्षा भरतीमध्ये (MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती) संगणकावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. कोरोना काळानंतर जगात जसे ‘पेपरलेस’ कामकाज तसे पण वाढत चालले आहे.

आज आपण या लेखात संगणकाचा इतिहास, त्याचे प्रकार, भाग आणि परीक्षेला विचारले जाणारे महत्त्वाचे कीबोर्ड शॉर्टकट्स याची सविस्तर माहिती घेणार आहोत.

१. संगणक म्हणजे काय? (What is Computer?)

‘Computer’ हा शब्द इंग्रजी भाषेतील ‘Compute’ (गणना करणे / आकडेमोड करणे) या शब्दावरून तयार झाला आहे. सुरुवातीच्या काळात संगणकाचा उपयोग केवळ आकडेमोड (कॅल्क्युलेटरसारखा) करण्यासाठीच होत असे. पण आजचे संगणक केवळ आकडेमोड करत नाहीत, तर ते माहिती स्वीकारणारे, साठवणारे आणि प्रगत प्रक्रिया करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र बनले आहे.

लक्षात ठेवा: संगणक हे ‘इलेक्ट्रिक’ नसून ‘इलेक्ट्रॉनिक’ (Electronic) यंत्र आहे.

COMPUTER चा फुल फॉर्म (Full Form):

  • C – Commonly

  • O – Operated

  • M – Machine

  • P – Particularly

  • U – Used for

  • T – Technical and

  • E – Educational

  • R – Research

संगणकाची मुख्य ३ कार्ये: १. Input (इनपुट): माहिती किंवा डेटा संगणकात स्वीकारणे. २. Process (प्रक्रिया): इनपुट केलेल्या माहितीवर संगणकाच्या मेंदूत (CPU) प्रक्रिया करणे. ३. Output (आउटपुट): प्रक्रिया केलेल्या माहितीचे अचूक उत्तर मॉनिटर किंवा प्रिंटरद्वारे बाहेर देणे.

२. संगणकाचा इतिहास आणि जनक (History of Computer in Marathi)

  • चार्ल्स बॅबेज (Charles Babbage): यांना ‘संगणकाचे जनक’ (Father of Computer) म्हटले जाते. १८२२ मध्ये त्यांनी ‘डिफरेन्स इंजिन’ (Difference Engine) नावाच्या यांत्रिक संगणकाचा शोध लावला. त्यांनी पहिल्यांदा मेकॅनिकल कॉम्प्युटर डिझाईन केले होते.

  • डॉ. हरमन होलेरिथ: १८८० मध्ये या अमेरिकन शास्त्रज्ञाने ‘पंच कार्ड’ (Punch Card) प्रणालीचा शोध लावला. त्यांनीच आजची जगप्रसिद्ध IBM (International Business Machines) ही कंपनी सुरू केली.

  • जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक १९४७ मध्ये अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठ आणि IBM कंपनीने संयुक्तपणे तयार केला.

३. संगणकाच्या पिढ्या (Generations of Computer in Marathi)

परीक्षेच्या दृष्टीने संगणकाच्या पिढ्या आणि त्यात वापरलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे:

१. पहिली पिढी (First Generation – १९४० ते १९५६): या पिढीत ‘व्हॅक्युम ट्यूब’ (Vacuum Tubes – निर्वात नळ्या) चा वापर झाला. हे संगणक आकाराने एका मोठ्या खोलीएवढे होते. ते खूप उष्णता निर्माण करत असत, त्यामुळे त्यांना एअर कंडिशनरची (AC) गरज लागायची. पंच कार्डद्वारे इनपुट दिले जायचे. २. दुसरी पिढी (Second Generation – १९५६ ते १९६३): या पिढीत व्हॅक्युम ट्यूबच्या जागी ‘ट्रान्झिस्टर’ (Transistors) चा वापर सुरू झाला. ट्रान्झिस्टर आकाराने लहान असल्याने संगणकाचा आकार कमी झाला. यात ‘असेंब्ली लँग्वेज’चा वापर सुरू झाला. ३. तिसरी पिढी (Third Generation – १९६४ ते १९७१): यात ‘आयसी’ (IC – Integrated Circuits) चा वापर झाला. इथून खऱ्या अर्थाने ‘मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स’ शाखा उदयास आली. माहिती साठवण्यासाठी ‘मॅग्नेटिक डिस्क’ वापरली जाऊ लागली. ४. चौथी पिढी (Fourth Generation – १९७१ ते आजपर्यंत): यात मायक्रोप्रोसेसर आणि VLSI (Very Large Scale Integration) तंत्रज्ञानाचा वापर झाला. एका लहान चिपवर हजारो कंपोनेंट्स बसवले गेले. आज आपण जे डेस्कटॉप, लॅपटॉप वापरतो, ते याच पिढीतील आहेत. ५. पाचवी पिढी (Fifth Generation – भविष्य): ही पिढी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence / AI) आणि रोबोटिक्सवर (Robotics) आधारित आहे. यात संगणक स्वतः विचार करून निर्णय घेण्यास सक्षम होत आहेत.

४. संगणकाचे प्रकार (Types of Computer in Marathi)

A) कार्यानुसार (Based on Work):

  • अ‍ॅनालॉग (Analog): तापमान, हवामान, दाब मोजण्यासाठी वैज्ञानिक आणि इंजिनिअर याचा वापर करतात.

  • डिजिटल (Digital): शब्द, अंक, चिन्हे यावर प्रक्रिया करणारे. आपण वापरतो ते डिजिटल संगणक असतात.

  • हायब्रिड (Hybrid): अ‍ॅनालॉग आणि डिजिटल या दोघांच्या मिश्रणातून बनलेले संगणक.

B) आकार आणि क्षमतेनुसार (Based on Size):

  • सुपर कॉम्प्युटर (Super Computer): हे सर्वात शक्तिशाली आणि वेगवान संगणक असतात. एकाच वेळी हजारो लोक यावर काम करू शकतात. अंतराळ संशोधन (ISRO/NASA), हवामान अंदाज यासाठी याचा वापर होतो. (उदा. भारताचा ‘परम’ संगणक).

  • मेनफ्रेम (Mainframe Computer): सुपर संगणकापेक्षा थोडे लहान. बँक, विमा कंपन्या, रेल्वे रिझर्व्हेशनमध्ये मोठ्या डेटासाठी वापरले जातात.

  • मिनी संगणक (Mini Computer): मेनफ्रेमपेक्षा लहान. व्यावसायिक संस्था आणि कारखान्यांमध्ये वापरले जातात.

  • मायक्रो संगणक (Micro Computer): आपण वैयक्तिक कामासाठी वापरतो ते. याला PC (Personal Computer) म्हणतात. डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट हे याचेच प्रकार आहेत.

५. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर (Hardware & Software Information in Marathi)

  • हार्डवेअर (Hardware): संगणकाचे जे भौतिक भाग आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि हाताने स्पर्श करू शकतो, त्यांना हार्डवेअर म्हणतात. उदा. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, CPU, प्रिंटर इ.

  • सॉफ्टवेअर (Software): ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, पण जे हार्डवेअरला काम करण्यासाठी सूचना देते त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. उदा. Windows 11, MS Office, YouTube, WhatsApp इ.

६. इनपुट आणि आउटपुट साधने (Input vs Output Devices)

  • इनपुट साधने (Input Devices): ज्याद्वारे आपण संगणकाला माहिती किंवा कमांड देतो.

    • उदा: कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, जॉयस्टिक (गेमसाठी), वेबकॅम, ट्रॅकबॉल.

  • आउटपुट साधने (Output Devices): ज्याद्वारे संगणक प्रक्रियेनंतरचा निकाल आपल्याला देतो.

    • उदा: मॉनिटर (स्क्रीन), प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर, हेडफोन्स.

७. संगणकाचे मुख्य अंतर्गत भाग (CPU Components)

Inside the System Unit processing and Memory & How the CPU works and Making Computers father and… | by Mushtaque1503 | Medium

  • CPU (Central Processing Unit): याला ‘संगणकाचा मेंदू’ (Brain of Computer) म्हणतात. सर्व प्रकारच्या गणना आणि प्रक्रिया येथेच होतात. यात ALU (Arithmetic & Logic Unit) असते.

  • मदरबोर्ड (Motherboard): हा मुख्य सर्किट बोर्ड असतो. CPU, रॅम आणि इतर सर्व घटक याच बोर्डवर जोडलेले असतात.

  • RAM (Random Access Memory): ही अस्थिर (Volatile) आणि तात्पुरती मेमरी आहे. संगणक चालू असतानाची कामे यात होतात. वीज गेल्यास यातील डेटा नष्ट होतो.

  • ROM (Read Only Memory): ही कायमस्वरूपी (Non-volatile) मेमरी असते. ही फक्त वाचता येते.

  • Hard Drive (HDD / SSD): ही दीर्घकालीन मेमरी आहे. संगणक बंद असला तरी आपला डेटा (फोटो, फाईल्स) यात सुरक्षित राहतो.

  • PSU (Power Supply Unit): AC करंटचे DC करंटमध्ये रूपांतर करून संगणकाला वीज पुरवते.

  • GPU (Graphics Processing Unit): मॉनिटरवर स्पष्ट चित्र (Graphics) दिसण्यासाठी याचा उपयोग होतो.

  • NIC (Network Interface Card): संगणकाला इंटरनेट (LAN) जोडण्यासाठी हे कार्ड लागते.

८. संगणकाची भाषा आणि मेमरी एकके (Computer Memory Units)

संगणकाला आपली भाषा कळत नाही. तो फक्त ‘बायनरी सिस्टीम’ (Binary System) समजतो, जी ० (शून्य) आणि १ (एक) या दोन अंकांवर आधारित असते.

  • ० किंवा १ = १ बिट (Bit)

  • ८ बिट्स (8 Bits) = १ बाईट (Byte)

  • १०२४ बाईट्स = १ किलोबाईट (1 KB)

  • १०२४ KB = १ मेगाबाईट (1 MB)

  • १०२४ MB = १ गिगाबाईट (1 GB)

  • १०२४ GB = १ टेराबाईट (1 TB)

(टीप: हा तक्ता परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.)

९. महत्त्वाच्या कीबोर्ड शॉर्टकट कीज (Keyboard Shortcut Keys)

परीक्षेत हमखास विचारले जाणारे शॉर्टकट्स:

Control (Ctrl) Shortcuts:

  • Ctrl + A = सर्व सिलेक्ट करणे (Select All)

  • Ctrl + B = अक्षर ठळक करणे (Bold)

  • Ctrl + C = कॉपी करणे (Copy)

  • Ctrl + V = पेस्ट करणे (Paste)

  • Ctrl + X = कट करणे (Cut)

  • Ctrl + Z = अनडू करणे (Undo – पाठीमागे जाणे)

  • Ctrl + Y = रीडू करणे (Redo)

  • Ctrl + S = फाईल सेव्ह करणे (Save)

  • Ctrl + P = प्रिंट काढणे (Print)

  • Ctrl + O = फाईल ओपन करणे (Open)

  • Ctrl + N = नवीन फाईल घेणे (New)

  • Ctrl + F = फाईंड / शोधणे (Find)

  • Ctrl + U = अधोरेखित करणे (Underline)

Function Keys (F1 ते F12):

  • F2 = फाईलचे नाव बदलणे (Rename)

  • Alt + F4 = चालू प्रोग्राम किंवा संगणक बंद करणे (Shut down / Close)

  • F5 = रिफ्रेश करणे (Refresh)

  • F7 = स्पेलिंग आणि ग्रामर चेक करणे (MS Word मध्ये)

  • F11 = फुल स्क्रीन मोड (Full Screen)

निष्कर्ष (Conclusion)

मित्रांनो, संगणक हे आजच्या काळात अष्टपैलू साधन बनले आहे. वेगवान काम, प्रचंड डेटा साठवण्याची क्षमता आणि अचूकता यामुळे शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, व्यवसाय आणि अंतराळ संशोधनात याचा वापर अनिवार्य झाला आहे. स्पर्धा परीक्षा भरतीसाठी वर दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल. याचा वारंवार सराव करा.

Also read

भारतीय राज्यघटना संपूर्ण माहिती

Leave a Comment