वनरक्षक भरती २०२२ अभ्यासक्रम | Vanrakshak Bharti Information in Marathi
Vanrakshak Bharti Information in Marathi: विद्यार्थीमित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये वनरक्षक भरती च्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत. भुतपूर्व दुय्यमसेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने संदर्भाधीन क्र.२ येथील नमूद शासन निर्णय दि.२१/११/२०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित),गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना यापुढे स्पर्धा परीक्षा टि.सी.एस.आय.ओ.एन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास शासन मान्यता दिली आहे.
वनरक्षक भरती लेखी परीक्षा
वनरक्षक भरतीसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पात्र असलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात. लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत १० वी च्या पातळीची राहील. लेखी परीक्षा ही नियोजित स्थळावर ऑनलाईन पद्धतीने संगणकावर घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी, इंग्रजी हे चार विषय असणार आहेत. सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास, वन, पर्यावरण, हवामान, जैव विविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन हे मुद्दे असतील. लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान ३० गुण, बौद्धिक चाचणी ३० गुण, मराठी ३० गुण, इंग्रजी ३० गुण असे प्रत्येक विषयाला गुण असणार आहेत.
लेखी परीक्षा ही ९० मिनिटांची असणार आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाची असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला अधिकाधिक १ गुण असणार आहे. जर तुमचे उत्तर चुकले तर ०.५ इतके गुण कमी करण्यात येणार आहे. जर तुम्हाला ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले तर तुम्ही भरतीच्या पुढील टप्प्याकरीता पात्र राहणार आहात. जर तुम्हाला किमान ४५% गुण मिळाले नाही तर तुम्ही भरतीच्या पुढील टप्प्यासाठी बाद ठरणार आहात.

वनरक्षक भरती शारीरीक चाचणी
लेखी परीक्षेमध्ये ४५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्यानंतर तुम्ही शारीरीक चाचणी साठी पात्र राहणार आहात. शारीरीक परीक्षेमध्ये तुमची धावण्याची ८० मार्कांची चाचणी घेतली जाते.
पुरुष उमेदवारांसाठी धावण्याची चाचणी
पुरुष उमेदवारांची ५ कि.मी अंतर धावण्याची शारीरीक चाचणी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांची धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्या अनुसार गुण दिले जातात. धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी साठी किती गुण दिले जाणार आहेत ते खालीलप्रमाणे –
१) १७ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ८० गुण
२) १७ मिनिट पेक्षा जास्त परंतु १८ मिनिटापेक्षा कमी – ७० गुण
3) १८ मिनिट पेक्षा जास्त परंतु १९ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ६० गुण
4) १९ मिनिट पेक्षा जास्त परंतु २० मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ५० गुण
5) २० मिनिट पेक्षा जास्त परंतु २१ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ४५ गुण
6) २१ मिनिट पेक्षा जास्त परंतु २२ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ४० गुण
7) २२ मिनिट पेक्षा जास्त परंतु २३ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ३५
8 ) २३ मिनिट पेक्षा जास्त परंतु २४ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ३० गुण
9) २४ मिनिट पेक्षा जास्त परंतु २५ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – २५ गुण
10) २५ मिनिट पेक्षा जास्त परंतु २६ मिनिट पेक्षा कमी – २० गुण
11) २६ मिनिट पेक्षा जास्त परंतु २७ मिनिट पेक्षा कमी – १५ गुण
12) २७ मिनिट पेक्षा जास्त परंतु २८ मिनिट पेक्षा कमी – १० गुण
13) २८ मिनिट पेक्षा जास्त परंतु २९ मिनिट पेक्षा कमी – ५ गुण
14) २९ मिनिट पेक्षा जास्त परंतु ३० मिनिट पेक्षा कमी – ० गुण
३० मिनिटांमध्ये ५ कि.मी धावू न शकणारा पुरूष उमेदवार भरती प्रक्रियेतुन बाद होईल.
NEET Exam information in marathi
महिला उमेदवारांसाठी धावण्याची चाचणी
महिला उमेदवारांची ३ कि.मी धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. धावण्याची चाचणी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी साठी किती गुण दिले जाणार आहेत ते खालीलप्रमाणे –
1) १२ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ८० गुण
2) १२ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु १३ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ७० गुण
3) १३ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु १४ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ६० गुण
4) १४ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु १५ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ५० गुण
5) १५ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु १६ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ४५ गुण
6) १६ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु १७ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ४० गुण
7) १७ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु १८ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ३५ गुण
8) १८ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु १९ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ३० गुण
9) १९ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु २० मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – २५ गुण
10) २० मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु २१ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – २० गुण
11) २१ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु २२ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – १५ गुण
12) २२ मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु २३ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – १० गुण
13) २३मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु २४ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी- ५ गुण
14) २४मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त परंतु २५ मिनिट किंवा त्यापेक्षा कमी – ० गुण
२५ मिनिटांमध्ये ३ कि.मी धावू न शकणारी महिला उमेदवार भरती प्रक्रियेतुन बाद होईल.
चालण्याची परीक्षा
निवड यादीतील सर्व उमेदवार व प्रतिक्षा यादीतील गुणाक्रमे ५०% उमेदवार (परंतु किमान एक उमेदवार) वनरक्षक पदासाठी चार तासात पुरुष उमेदवारांना २५ कि.मी व महिला उमेदवारांना १६ कि.मी चालण्याची किंवा धावून शारीरीक क्षमता चाचणी पूर्ण करावी लागेल. जे उमेदवार सदर चाचणी विहित वेळेत पूर्ण करू शकणार नाही ते भरती प्रक्रियेतुन बाद ठरतील. सदर उमेदवारास चालण्याची चाचणी करीता दुसरी संधी दिली जाणार नाही.
वरील पोस्ट मध्ये आपण वनरक्षक भरती च्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती घेतली. आमची पोस्ट आवडल्यास शेयर करा.धन्यवाद !
तर विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे तुम्हाला आहे Vanrakshak Bharti Information in Marathi च्या आमच्या या लेखाद्वारे तुम्हाला वनरक्षक भरती संबंधी संपूर्ण माहिती मिळाली असेल. तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Vanrakshak abhyaskram