150+ Police Bharti Question Paper | Police Bharti Question Paper pdf in Marathi

Police Bharti Question Paper | Police Bharti Question Paper pdf in Marathi

Police Bharti Question Paper: मित्रांनो, तुम्हाला हे समजेल की लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती ची परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी शासनाने अधिसूचना सुद्धा दिली आहे. जर का तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तयारी करत असाल तर आजच्या या लेखात आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Police Bharti General Knowledge Question in Marathi.

विद्यार्थीमित्रांनो तुम्ही हे सर्व प्रश्न तुम्ही खाली दिलेल्या Police Bharti Question Paper pdf in Marathi या लिंक चा वापर करून download करू शकता.

Maharashtra Police Bharati Question Paper

1. सतत १२ तास दिवस व १२ तास रात्र कोठे असते?

A. विषुववृत्त 
B. मकरवृत्त
C. कर्कवृत्त
D. अंटार्टिका

2. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते
A. महानगरपालिका
B. केंद्र सरकार 
C. राज्य सरकार
D. जिल्हा परिषद

3. महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात घेतले जाते?
A. विदर्भ
B. पश्चिम महाराष्ट्र 
C. मराठवाडा
D. दक्षिण महाराष्ट्र

4. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
A. कातडी वस्तु
B. कागद
C. होजीअरी 
D. औषधी निर्माण

5. ‘बाळ दररोज शाळेत जातो’ या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.
A. बाळ दररोज शाळेत जाई
B. बाळ दररोज शाळेत जात होता 
C. बाळ दररोज शाळेत गेला.
D. बाळ दररोज शाळेत जात असेल

6. कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरविण्याचा अधिकार आहे?
A. 405
B. 345 
C. 109
D. 210

7. ‘स्वत: मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.
A. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी
B. उथळ पाण्याला खळखळाट फार 
C. आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला
D. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

8. ________ च्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगार म्हणतात.
A. ऍसिटाल्डीहाइड
B. मिथिलेटेड स्पिरीट
C. ऍसेटिक आम्ल 
D. इथेनॉल

9. केळीमध्ये मुख्य घटक कोणता असतो?
A. प्रथिने
B. ग्लुकोज 
C. कर्बोदके
D. मेद

10. ‘ससेमिरा लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय?
A. तिखट लागण्याने सुं सुं आवाज करणे .
B. सशाने मिरे खाणे
C. नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे 
D. ससा भाजणे,मिरे लावून खाणे

11. वि. रा. शिंदे यांना महर्षी हि पदवी कोणी दिली ?
A. अस्पृश्य जनता
B. राष्ट्रीय मराठा संघ 
C. सर्वसामान्य जनता
D. राष्ट्रीय बहुजन संघ

12. बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत?
A. शेख अखतर शेख अब्‍दुल
B. शेख मुजीब-उर-रहमान 
C. पठाण अखतर
D. यापैकी नाही

13. केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे?
A. मध्य प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. उत्तराखंड 
D. ओडिसा

14. एम.सी. मेरी कोम कोणत्या राज्याची आहे?
A. मणिपूर 
B. आसाम
C. मिझोराम
D. मेघालय

15. कारगिल कोणत्या राज्यात आहे?
A. जम्मू आणि काश्मीर 
B. हिमाचचल प्रदेश
C. उत्तराखंड
D. पंजाब

16. ‘कालगती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस’ याअर्थी पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार आहे?
A. खप्पीदास
B. कळीचा नारद 
C. गोमाजी तिमाजी
D. यापैकी नाही

17. भारतात सर्वात दाट लोकवस्ती असलेला शहर कोणता आहे?
A. मुंबई 
B. नवी दिल्ली
C. कोलकाता
D. पंजाब

18. मुघल सम्राट औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शाहू आणि त्याचा आईला कुठे कैदी ठेवले?
A. खानदेश
B. सातारा 
C. मेवाड
D. अवध

19. राजा रविवर्मा हे कोण होते?
A. गायक
B. चित्रकार 
C. वैज्ञानिक
D. खेळाडू

20. खालीलपैकी कोणता दिवस हा ‘महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो?
A. 5 जुलै 
B. 25 जानेवारी
C. 26 नोव्हेंबर
D. 6 जून

21. श्रीकांत किदम्बी कोणत्या खेळाचे लोकप्रिय खेळाडू होते?
A. बॅडमिंटन 
B. क्रिकेट
C. हॉकी
D. टेनिस

22. देवापुढे सतत तेवत असणारा दिवा कोणता?
A. समई
B. दीपज्योत
C. दीप
D. नंदादीप 

23. बाजीराव पेशव्याचा पहिला विजय कोणत्या ठिकाणी झाला?
A. पालखेड 
B. मावळा
C. भोपाळ
D. रायगड

24. Digital Life कोणत्या कंपनी चे घोषवाक्य आहे?
A. रिलायन्स जिओ 
B. वोडाफोन
C. बीएसएनल
D. एरटेल

25. ‘यावल अभयारण्य’ कोठे आहे?
A. सिंधुदुर्ग
B. जळगाव 
C. जुनागड
D. बारपेटा

Maharashtra Police Bharti General Knowledge Questions in Marathi

 

26. पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिराच्या सोमोर कोणत्या संतांची समाधी आहे?
A. संत तुकाराम
B. संत एकनाथ 
C. संत नामदेव
D. संत रामदास

27. ‘एकच प्याला’ या नाटकाचे लेखन कोणी केले?
A. विजय तेंडुलकर
B. राम गणेश गडकरी 
C. जी.पी.देशपांडे
D. यापैकी नाही

28. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
A. विघातक 
B. संकट
C. विनायक
D. यापैकी नाही

29. भारतात …………. हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते?
A. चंद्रनगर
B. सुरत
C. पॉंडिचेरी 
D. यापैकी नाही

30. केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशेब तपासण्याचे काम कोण करतो?
A. महान्यायवादी
B. नियंत्रण व महालेखापाल 
C. वित्त आयोग
D. अंदाज आयोग

Police Bharti online Test

31. कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
A. भारताचा महान्यायवादी
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. वित्त आयोग 

32. वनस्पती प्रामुख्याने नत्र कोणत्या स्वरूपात शोषतात?
A. नायट्रेट 
B. नायट्राईट
C. अमाईट
D. यापैकी नाही

33. बझार ऑफ ड्रीम्स या कांदबरीचे लेखक कोण आहेत?
A. स्टीव्हन किंग 
B. स्टन्ले
C. चेतन भगत
D. यापैकी नाही

34. सुशासन दिन कोणत्या तारखेस साजरा करण्यात आला?
A. 25 डिसेंबर 
B. 25 फेब्रुवारी
C. 25 जानेवारी
D. 25 जून

35. १०.०७ + १.०२३ =?
A. १८.३६
B. ११.१०३
C. ११.८२३
D. ११.०९३ 

36. ‘जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
A. जागृत
B. आमचे 
C. कर्तव्य
D. करणे

37. ढगांवर कशामुळे प्रभारनिर्मिती होते?
A. घर्षण 
B. आकर्षण
C. वहन
D. यापैकी नाही

38. रेग्युलेटिंग एक्ट कायदा कोणत्या साली पास झाला?
A. १९७२
B. १९७३
C. १९७४
D. १७७३ 

39. भारतात आधुनिक रसायन उद्योगाचा पाया कुणी रचला?
A. टी.आर.शेषाद्री
B. ची.एन.आर.राव
C. पी.सी. रॉय 
D. यापैकी नाही

40. खालीलपैकी अरबी शब्दांचा गट ओळखा?
A. हुक्कम, तपास
B. अर्ज, किल्ला
C. शाहीर, साहेब 
D. कामगार, मालक

41. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
A. ३८.२९९
B. ३८२.१००
C. ३८२.९९ 
D. ३८.९८९८

42. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?
A. दलांबर
B. स्थितांबर 
C. तपांबर
D. यापैकी नाही

43. अमृतसरचे संस्थापक कोण होते?
A. गुरु गोविंद सिंग
B. गुरु रामदास 
C. महाराजा रणजित सिंग
D. यापैकी नाही

44. परिसंस्थेमध्ये मानव प्राणी कोणत्या गटात मोडतो?
A. भक्षक 
B. विघटक
C. उत्पादक
D. यापैकी नाही

45. कविता कृष्णमूर्ती प्रसिद्ध कोण आहेत?
A. चित्रकार
B. गायक 
C. राजकारणी
D. अभिनेत्री

46. भारतीय राष्ट्रीय सेनादलाचे स्थापना केव्हा झाली?
A. १९५०
B. १९४२ 
C. १९००
D. १९८२

47. जागतिक ग्राहक दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. १२ मार्च
B. १३ मार्च
C. १४ मार्च
D. १५ मार्च 

48. कैसर विल्यम दुसरा कुठला सम्राट होता?
A. इंग्लंड
B. जर्मनी 
C. इटली
D. फ्रान्स

49. श्याम बेनेगल हे प्रसिद्ध कोण होते?
A. दिग्दर्शक 
B. गायक
C. लेखक
D. कवी

50. अण्णा हजारे यांचा जन्म कोणत्या शहरात झाला?
A. नाशिक
B. अहमदनगर 
C. मुंबई
D. अमरावती

51. जगन्नाथाची प्रसिद्ध रथयात्रा कोठे व कोणत्या राज्यात भरते ?

A. पुरी-ओरिसा 
B. रामेश्वर-तामिळनाडू
C. तिरुपती-आंध्र प्रदेश
D. कोणार्क-ओरिसा

52. महात्मा गांधींचे मानसपुत्र मानले जाणा‍र्‍या ह्या महनीय व्यक्तीला 1983 साली ‘ भारतरत्‍न ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
A. आचार्य विनोबा भावे 
B. महर्षी धोंडो केशव कर्वे
C. सेनापती बापट
D. डॉ. अच्युतराव पटवर्धन

53. विचारलहरी’ नावाचे वृत्तपत्र कोणी चालविले
A. विष्णुशास्त्री चिपळूणकर
B. कृष्णाशास्त्री चिपळूणकर 
C. विष्णुबुवा ब्रहाचारी
D. विष्णुशास्त्री जोशी

54. समाजसुधार्कांपैकी १८५१ मध्ये कोणत्या समाजसुधारकाने वैद्यकीय क्षेत्रातील पदवी संपादन केली .
A. शी.म.परांजपे
B. आत्माराम पांडुरंग
C. गो.ह.देशमुख
D. रामचंद्र विठ्ठल लाड 

55. आणीबाणीच्या काळात …………….हे वास्तविक शासक बनतात .
A. राष्ट्रपती 
B. उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. सरन्यायाधीश

56. आम्ल पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजनची ऑक्साईडस् आणि _______________ हे जबाबदार असतात.
A. कार्बन डाय ऑक्साईड
B. सल्फर डाय ऑक्साईड 
C. ऑक्सिजन
D. हायड्रोजन

57. खालीलपौकी श्वानाच्या कोणत्या जातीचा महाराष्ट्र पोलिसांचे श्वानपथकात समावेश नाही.
A. डॉबरमन
B. लाब्राडोर
C. जर्मन शेपर्ड
D. बूल टेरिअर 

58. कीटकनाशकआणि रोगनाशक द्रव्य खालीलपौकी कोणत्या वनस्पतीपासून मिळविता येते
A. कडूलिंब 
B. जत्रोफा
C. बेशरम
D. वरील सर्व

59. जठरामध्ये स्त्रावणारे पेप्सिन आहारातील . . . . या पोषकतत्त्वाचे पचन करते.
A. प्रथिन 
B. स्निग्धे
C. कर्बोदके
D. जीवनसत्त्व

60. गर्भधारणेपासून जन्मापर्यंत असलेली अवस्था अंदाजे . . . . दिवसाची असते
A. 200 ते 225
B. 270 ते 280 
C. 300 ते 310
D. 225 ते 240

Police Bharti question paper 2022

61. १५ : २२८ : : २५ : ?
A. ६२८ 
B. ४५१
C. ५२५
D. ६३५

62. रक्तात असणा·या प्रथिनाला काय म्हटले जाते.
A. मायोसीन
B. फायब्रीनोजन 
C. कैसीन
D. व्हिटेलीन

63. ‘अखंड प्रेरणा-गांधी विचारांची’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
A. मोहन धारीया
B. अण्णा हजारे
C. डॉ. रघुनाथ माशेलकर 
D. डॉ.विश्वनाथ कराड

64. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
A. पुणे
B. राहुरी 
C. कोपरगाव
D. अहमदनगर

65. मालगुजारी तलाव महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पाहायला मिळतात?
A. कोकण
B. खानदेश
C. मराठवाडा
D. विदर्भ 

66. भारतात सर्वप्रथम वायरलेस ब्रॉडबॅण्ड वर 4-G सेवांची सुरुवात कोणत्या कंपनीने केली ?
A. व्होडाफोन
B. एअरटेल 
C. टेलीनॉर
D. बी.एस.एन.एल

67. सातपुडा पर्वताच्या पश्चिम भागात …. चे पठार आहे.
A. तोरणमाळ
B. पाचगणी
C. महाबळेश्वर
D. साल्हेर

68. कोणाला ‘वर्गीकरणशास्त्राचा जनक ‘ म्हणून ओळखले जाते ?
A. रॉबर्ट हूक
B. कार्ल लिनियस 
C. जगदीशचंद्र बोस
D. यापैकी नाही

69. वन्यजीव सप्ताह’ कधी साजरा केला जातो?
A. 1 ते 7 सप्टेंबर
B. 1 ते 7 ऑक्टोबर 
C. 1 ते 7 नोव्हेंबर
D. 1 ते 7 डिसेंबर

70. भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
A. पुणे
B. सातारा
C. अहमदनगर 
D. यापैकी नाही

71. नेफा हे ______________ चे जुने नाव आहे.
A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश 
D. त्रिपुरा

72. ज्या लोहमार्गाची रुंदी १.६७मि.एवढी असते त्या लोहामार्गास … असे म्हणतात .
A. ब्रॉडगेज 
B. मीटर गेज
C. नरोगेज
D. यापैकी नाही

73. सलाल हा जलविद्युत प्रकल्प कोठे आहे.
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. उत्तराखंड
D. जम्मू-काश्मीर 

74. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर धुळे वसलेले आहे?
A. NH7
B. NH1
C. NH3 
D. NH10

75. विशालगड किल्ला …….. जवळ आहे.
A. लोणावळा
B. कोल्हापूर 
C. गणपतीपुळे
D. अलिबाग

76. पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता ?
A. १९६४-१९६९
B. १९७४-१९७९ 
C. १९६१-१९६६
D. यापैकी नाही

77. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A. १९४६
B. १९४८
C. १९४७
D. १९४५ 

78. आकाराने लहान व सर्वात वेगवान ग्रह कोणता?
A. बुध 
B. गुरु
C. शुक्र
D. शनि

79. महर्षी कर्वेचा योग्य जन्म-मृत्यू काळ ओळखा.
A. १८५८-१९६३
B. १८५८-१९६२ 
C. १८७४-१९२२
D. १८५६-१८९५

80. झारखंड राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली?
A. सातव्या
B. बारावी
C. दहावी 
D. यापैकी नाही

81. ड्युरंड लाईन ही खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे?
A. पाकिस्तान – अफगाणिस्तान 
B. इराण – इराक
C. भारत – चीन
D. भारत – बांग्लादेश

82. ‘द टेस्ट ऑफ माय लाईफ’ हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे?
A. हरभजन सिंग
B. सचिन तेंडुलकर
C. युवराज सिंग 
D. एम. एस. धोनी

83. वेव्हेल योजना केव्हा भारतात आली ?
A. १९४६
B. १९४५ 
C. १९४४
D. १९४७

84. ‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
A. शापित
B. लोभी
C. उदार 
D. कंजूष

85. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोणत्या ठिकाणी आहे?
A. रांची
B. पटियाला 
C. बेंगलोर
D. मोहाली

86. ‘वाटेल ते बोलणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
A. डोळे उघडणे
B. जिभेला हाड नसणे 
C. कान फुकने
D. यापैकी नाही

87. १२ रु डझन प्रमाणे ८४ डझन केळी कितीला होतील ?
A. १०११
B. १०१०
C. १०२४
D. १००८ 

88. वंगबंधू कोणाला म्हणतात?
A. शेख वाजीद हसन
B. ए. गफार खान
C. शेख मुजीबुर रहेमान 
D. शेख अब्दूल गफार खान

89. पहिली सार्क परिषद कोठे भरली होती ?
A. अमेरिका
B. ढाका 
C. लंडन
D. रशिया

90. कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते?
A. पहिल्या
B. दुसऱ्या 
C. तिसऱ्या
D. यापैकी नाही

Police bharti question paper pdf

91. भादलवाडी तलाव कोणत्या धरणाचे मोठे जलाशय आहे?
A. कोयना
B. इसापूर
C. उजनी 
D. तोतलाडोह

92. विरुद्धार्थी शब्द ओळखा ‘शस्त्र’
A. ढाल
B. निः शस्त्र 
C. शत्रू
D. निसज्ज

93. भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळला गेलेला शेवटचा विश्वकप सामना कोणत्या शहरात झाला?
A. मुंबई 
B. दिल्ली
C. चेन्नई
D. कोलकाता

94. गर्भजल परिक्षणावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
A. दिल्ली
B. महाराष्ट्र 
C. गुजरात
D. कर्नाटक

95. कानात मुंग्यांच वारूळ होणे म्हणजे काय?
A. कान दुखणे
B. खूप राग येणे 
C. बहिरेपणा येणे
D. यापैकी नाही

96. रौप्य महोत्सवी वर्षाला किती वर्ष पूर्ण होतात?
A. पंचवीस 
B. साठसाठ
C. पंच्याहत्तर
D. पन्नास

97. ताश्कंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते ?
A. इंदिरा गांधी
B. पं. जवाहरलाल नेहरू
C. मोरारजी देसाई
D. लाल बहादूर शास्त्री 

98. पंचायत समितीला आसाम मध्ये काय म्हंटले जाते?
A. आंचलिक पंचायत 
B. जनपद सभा
C. जिला पंचायत
D. महकमा परिषद

99. जयसिंह आणि शिवाजी महाराज यांच्यात १६६५ मध्ये कोणता तह झाला होता?
A. पन्हाळा तह
B. पुरंदरचा तह 
C. सातारा तह
D. यापैकी नाही

100.UNIFEM ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
A. लहान मुले
B. गरीब मुले
C. स्त्रिया 
D. दुष्काळग्रस्त
United Nations Development Fund for Women

101. भारत डायनॅमिक्स लिमिटेड चे मुख्यालय कुठे आहे?
A. मुंबई
B. बेंगलूर
C. हैद्राबाद 
D. दिल्ली

102. ‘सरस्वती पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
A. संगीत
B. साहित्य 
C. चित्रपट
D. चित्रकला

103. ‘अर्धापुरी’ ही जात कोणत्या फळाची आहे ?
A. आंबा
B. चिकू
C. केळी 
D. मोसंबी

104. बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक कोण आहेत ?
A. बाबा आमटे
B. अभय बंग 
C. नरेंद्र बाभोलकर
D. बाबा आढाव

105. गुरु या ग्रहाला एकूण उपग्रह किती ?
A. २२
B. १
C. ६३ 
D. ७२

106. भारतात स्थापना झालेली पहिली नगर परिषद कोणती होती?
A. मद्रास 
B. कलकत्ता
C. दिल्ली
D. बॉम्बे

107. 10 किलोग्रॅम ÷ 25 ग्रॅम = ?
A. ५० ग्रॅम
B. ६० ग्रॅम
C. ४० ग्रॅम 
D. ३० ग्रॅम

108. प्राणवायूचा शोध कोणी लावला?
A. मार्कोनी
B. कोपर्निकस
C. जोसेफ प्रिस्टेल 
D. विल्यम हार्वे

109. महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस ‘वाचन प्रेरणा दिन‘ म्हणून साजरा केला जातो?
A. २१ जून
B. १४ नोव्हेंबर
C. १५ ऑगस्ट
D. १५ ऑक्टोबर 

110. चवदार तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला ?
A. रत्नागिरी
B. पुणे
C. रायगड 
D. बुलढाणा

Mumbai police bharti Questions

111. नागपूर शहरात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कोणते अधिवेशन भरते?
A. उन्हाळी
B. हिवाळी 
C. पावसाळी
D. आवश्यकतेनुसार

112. वि.दा.करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे?
A. विनायक दादू करंदीकर
B. विकास दामोदर करंदीकर
C. गोविंद विनायक करंदीकर
D. विनायक दामोदर करंदीकर 

113. ५०२.००१ – ०.२०९ = ?
A. ५०१.०९
B. ५०२.०४
C. ५०१.७९ 
D. यापैकी नाही

114. इस्त्रायल या देशाची राजधानी कोणती ?
A. दियान
B. जेरुसलेस 
C. कुवेत
D. दोहा

115. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे?
A. अकोला 
B. अमरावती
C. खामगाव
D. वर्धा

116. जगतिक बालिका दिन कधी साजरा केला जातो ?
A. १६ ऑक्टोबर
B. ११ ऑक्टोबर 
C. १० ऑक्टोबर
D. २४ ऑक्टोबर

117. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?
A. पुणे
B. सुरत
C. कोल्हापूर
D. नागपूर 

118. ‘मानवी हक्क दिन’ हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. १० जानेवारी
B. १० डिसेंबर 
C. १० नोव्हेबर
D. ११ डिसेंबर

119. ट्रफिक पोलीस अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात ?
A. स्पीड मीटर 
B. स्पीड अनलायझर
C. स्पीड अपरेटस
D. स्पीड गन

120. ‘स्वामी’ कांदबरीचे लेखक कोण आहेत ?
A. रणजीत देसाई 
B. वसंत कानेटकर
C. पु.ल. देशपांडे
D. साने गुरुजी

121. कोरेगाव भीमाची लढाई कोणत्या वर्षी गेली होती?
A. १७२०
B. १७१८
C. १८१८ 
D. १८५८

122. सूर्यमालेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर कोणता ग्रह आहे ?
A. मंगल
B. बुध
C. गुरु
D. पृथ्वी 

123. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन भारता सह दुसऱ्या कोणत्या देशाचा आहे?
A. श्रीलंका
B. दक्षिण कोरिया 
C. बांग्लादेश
D. दक्षिण आफ्रिका

124. महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोठे आहे ?
A. नागपूर
B. लातूर
C. सोलापूर 
D. कोल्हापूर

125. देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण आहेत ?
A. स्मृती इराणी
B. सुषमा स्वराज 
C. किरण बेदी
D. मेनका गांधी

126. टुंड्रा मृदा कोणत्या प्रकारच्या मृदेचे उदाहरण आहे?
A. विभागीय 
B. अविभागीय
C. पोडझोल
D. आंतर विभागीय

127. ‘तानाजी लढत होता आणि तो पडला’ हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे?
A. मिश्र
B. संयुक्त 
C. केवल
D. साधे

128. ‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणता लिंग प्रकारात येतो?
A. नपुसकलिंग 
B. पुल्लिंगी
C. स्त्रीलिंग
D. यापैकी नाही

129. राजीव गांधी यांचा जन्म दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
A. ऊर्जा दिवस
B. न्याय दिवस
C. सदभावना दिवस 
D. शोक दिवस

130. आग्रा या शहराचे संस्थापक कोण होते ?
A. सिकंधर लोधी 
B. शहाजहान
C. अल्लाउद्दीन खिलजी
D. अकबर बादशाह

131. मुंबई मधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने जाणले जाते?
A. बांद्रा बंदर
B. दाभोळ बंदर
C. ठाणे बंदर
D. न्हावा शेवा बंदर 

132. १२ मार्च हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा करतात ?
A. शिक्षक हक्क दिन
B. समता दिन 
C. मराठी राजभाषा दिन
D. सिंचन दिन

133. डेसिबल ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
A. हवेची आद्रता
B. प्रकाशाची तिव्रता
C. ध्वनीचा तिव्रता 
D. यापैकी नाही

134. सुती कापड उद्योगासाठी कोणता हवामान पूरक असते?
A. कोरडे
B. दमट 
C. थंडी
D. उष्ण

135. घाशीराम कोतवाल हे महान नाटक कुणी लिहिले?
A. चंद्रशेखर कम्बर
B. श्रीराम लागू
C. विजय तेंडुलकर 
D. यापैकी नाही

136. गो.ग. आगरकरांचे निधन कधी झाले ?
A. १९२०
B. १८९५ 
C. १९०५
D. १९५८

137. पुढील कोणता शब्द पोर्तुगीज आहे ?
A. कोबी
B. इस्पितळ 
C. तबियत
D. पोकेत

138. पुढील अर्धविरामाचे चिन्ह ओळखा.
A. :
B. !
C. ; 
D. ?

139. महेशच्या बहिणीच्या भाऊजीचा मुलगा व महेशचा मुलगा यांच्यातील नाते कोणते ?
A. मामा-भाचा
B. भाऊ -भाऊ
C. आते-भाऊ 
D. मावसभाऊ

140. कानात बुगडी गावात
A. तागडी
B. बेगडी
C. लुगडी
D. फुगडी 

141. झाशीचा दत्तक वारसां कोणी नामंजूर केला?
A. लॉर्ड मेयो
B. लॉर्ड बेटिंग
C. लॉर्ड डलहौसी 
D. लॉर्ड कॅनिंग

142. संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
A. जांब
B. देहू 
C. आळंदी
D. पैठण

143. महात्मा गांधीनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली ?
A. पं जवाहरलाल नेहरू
B. विनोबा भावे 
C. पं मोतीलाल नेहरू
D. आचार्य कृपलानी

144. संत रामदासांचे आडनाव काय होते ?
A. दामशेट्टी
B. समर्थ
C. कुलकर्णी
D. ठोसर 

145. ‘निपुण’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. हुशार
B. कामसू
C. प्रवीण 
D. यापैकी नाही

146. मुल्क राजा आनंद प्रसिद्ध ……. होते.
1. गायक
2. खेळाडू
3. लेखक 
4. दग्दर्शक

147. म्हणींना काय म्हणतात?
1. अर्थ
2. बोधपद
3. अनुभवाच्या खाणी 
4. वचन

Police Bharti Question Paper pdf in Marathi

Maharashtra police Bharti hall ticket

महाराष्ट्र पोलीस भरती च्या परीक्षेचे हॉल तिकीट download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download Maharashtra police Bharti hall ticket

विद्यार्थीमित्रांनो येणाऱ्या Maharashtra police Bharti परीक्षेसंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा .

विद्यार्थीमित्रांनो Police Bharti Question Paper या आमच्या लेखाच्या द्वारे आम्ही Maharashtra Police Bharti संबधी Questions paper च्या PDF वेळोवेळो अपलोड करत असतो. तसेच भरती परीक्षेच्या तयारी करता आमचा एक WhatsApp group सुद्धा आहे तो सुद्धा तुम्ही खाली दिलेल्या लिंक च्या साहाय्याने जॉईन करू शकता.

 

Leave a Comment